किर्लोस्कर संगीत मंडळी - विकिस्रोत
Jump to content
Main menu
Main menu
move to sidebar hide
सुचालन
मुखपृष्ठ
समाज मुखपृष्ठ
सद्य घटना
अलीकडील बदल
अविशिष्ट लेख
साहाय्य
चावडी
शोधा
शोधा
Appearance
दान
नवीन खाते तयार करा
प्रवेश करा(लॉग इन करा)
वैयक्तिक साधने
दान
नवीन खाते तयार करा
प्रवेश करा(लॉग इन करा)
किर्लोस्कर संगीत मंडळी
Add languages
दुवे जोडा
लेख
स्त्रोत
चर्चा
मराठी
वाचा
संपादन
इतिहास पहा
साधने
Tools
move to sidebar hide
Actions
वाचा
संपादन
इतिहास पहा
General
येथे काय जोडले आहे
या पृष्ठासंबंधीचे बदल
संचिका चढवा
शाश्वत दुवा
पानाची माहिती
हे पान उधृत करा
Get shortened URL
छापा
PDF छापा
छापण्यायोग्य आवृत्ती
इतर प्रकल्पात
विकिडाटा कलम
Appearance
move to sidebar hide
Download
विकिस्रोत कडून
किर्लोस्कर संगीत मंडळी (1908) साहित्यिक शंकर बापूजी मुजुमदार
sister projects: Wikidata item.
108183किर्लोस्कर संगीत मंडळी1908
किर्लोस्कर संगीत मंडळी.
जुने व नवे
प्रमुख नट, नाटककार, व स्मरणीय पात्रें.
हे पुस्तक "चित्रशाळा" छापखान्यांत रा. शंकर बापूजी मुजुमदार यांनी 'किर्लोस्कर संगीत मंडळीकरितां' छापून प्रसिद्ध केलें.
सन १९०८
आवृत्ति २ री.
दुसऱ्या आवृत्तीची प्रस्तावना
किर्लोस्कर संगीत मंडळीची २५ वर्षाची जुबिली सन १९०६ सालच्या फेब्रुवारी महिन्यांत झाली. त्यावेळीं प्रस्तुत पुस्तकाची पहिली आवृत्ति प्रसिद्ध झाली होती. ईश्वराच्या कृपेनें १९०८ सालाच्या आक्टोबर महिन्यांच्या ३१ तारखेस मंडळी स्थापन होऊन २८ वर्षे पूर्ण झाली आहेत. संस्थेचा जुनेपणाही तिच्यातील व्यक्तीमात्राचाही जुनेपणा दाखवीत असतो. अशा अनेक जुन्या माणसाच्या योगानें संस्थेला बळकटी आली आहे. प्रस्तुतच्या आवृत्तींत किर्लोस्कर मंडळींतील व्यक्तिशः स्मरणीय व महत्त्वाच्या अशा कांहीं नवीन पात्रांचा समावेश केला आहे.
पुणे, ता. २५ जानेवारी
सेक्रेटरी,
सन १९०९ इ०.
कि. सं. मंडळी.
अण्णासाहेब (बळवंत पांडुरंग) किर्लोस्कर अण्णासाहेब (बळवंत पांडुरंग) किर्लोस्कर- जन्म सन १८४३ मृत्यू १८८५. महाराष्ट्र संगीत नाट्यकलेचे उत्पादक, यांनी एक पांच वर्षांत नाट्यकलेत मोठी क्रांति करून सोडली; नाटकाचे पूर्वस्वरूप फार बदलून टाकलें; कवि, गाणारे व ग्रंथकार यांना उदयास आणलें; व समाजांत एक नवी करमणूक उत्पन्न केली. पूर्व वयांत 'अल्लाउद्दीनांची चितुर शहरावर स्वारी' व 'शंकरदिग्विजय' ह्रीं दोन गद्य नाटकें, नंतर शाकुंतल, सौभद्र, व रामराज्यवियोग, अशीं तीन अत्यंत लोकप्रिय झालेली संगीत नाटके लिहिली. यांचें चरित्र पुस्तक रूपानें प्रसिद्ध आहे.
मोरोबा बापुजी वाघुलीकर